7517 20 5555 swapnsrushti@kbdrealestate.com

श्रीम. नारकर यांचे मनोगत

श्री. व श्रीम. बापत यांचे मनोगत

श्री. सौरभ व सौ. मृण्मयी साळसकर , पुणे यांचे मनोगत

अजूनही मनोगत देणारे काही ग्राहक खालीलप्रमाणे

श्री.तुषार मधुकर कामेरकर, वय 32 वर्ष
मी तुषार मधुकर कामेरकर, मुळ रहाणार दादर, मुंबई. सध्या दुबई. माझ्या आई बाबांना कोंकणसृष्टीचा प्रकल्प खूप आवडला. तलावाचा व्ह्यू असलेला प्लॉट आम्ही घेतला. लवकरच तेथे घर बांधायचा माझा विचार आहे. मला झाडांची खूप आवड आहे. मी परदेशी असतानाही माझ्या झाडांची काळजी कोंकणभुमीची टिम चांगल्या प्रकारे घेते. त्यामुळे मी खुप समाधानी आहे.

श्री.अजित जगन्नाथ यादव, वय 70 वर्षे
मी अजित जगन्नाथ यादव, रिटायर्ड प्रोफेसर आहे. कोल्हापूर येथे रहातो. स्वतःचे घर आहे. आमची शेतजमीन खेरवसे येथे आहे. तेथे जाता-येताना कोंकणसृष्टी प्रोजेक्ट विषयी समजले. तेथे आधी प्लॉट घेतला नंतर घर बांधले. येथे अधूनमधून येऊन जाऊन असतो. सुंदर वातावरण आणि सर्व सोयींनी युक्त असा हा प्रोजेक्ट आम्हांला खुप आवडतो.

श्री. सौरभ शशिकांत साळसकर, वय 31 वर्षे
मी सौरभ साळसकर कोथरुड, पुणे येथे रहातो. माझ्या वडिलांनी कोंकणभुमी डेव्हलपर्सकडून अमृतसृष्टी प्रोजेक्टमध्ये सन 2008 साली प्लॉट घेतला होता. आम्ही तेथे आता घर बांधलेले आहे. पाणी, लाईट, रस्ता, कंपाऊंड या सर्व सुविधा आम्हांला त्यांचेकडून मिळालेल्या आहेत. आणि म्हणूनच मी स्वतः त्यांच्या नविन प्रोजेक्टमध्ये स्वप्नसृष्टीमध्ये एक प्लॉट बुक केलेला आहे. माझ्या शिफारशीवरुन माझे सासरे श्री. राजेंद्र गपचुप यांनी आणि मित्र श्री. सौरभ पाठक यांनी प्लॉट घेतला आहे.

श्री. बजरंग सखाराम सातपुते, वय 42 वर्षे
मी एक माध्यमिक शिक्षक असून माझी जन्मभुमी कोल्हापूर तर कर्मभुमी कोकण आहे. कोंकणात सर्व्हिसला लागल्यानंतर जसे लांज्यात रहायला आलो तसे कोंकणात आपले घर असावे अशी इच्छा झाली. त्याचवेळी श्री. कदम साहेब यांच्या भटवाडीतील प्रोजेक्टची माहिती मिळाली. प्रोजेक्टचे सर्वेसर्वा श्री. नितीन कदम यांची भेट घेतल्यावर त्यांचा स्वभाव, सहकार्य, मदत करण्याची प्रवृत्ती पाहून मी भटवाडीच्या प्रोजेक्टमध्ये पाच गुंठयांचा प्लॉट घेतला व त्यांच्याच सहकार्याने घर बांधून गेली चार वर्षे रहात आहे.

श्री.रविंद्र शिवराम जाधव, वय 54 वर्षे
माझा मुंबईत व्यवसाय आहे. माझे मुळ गांव कोंकणातलेच. आणि ‘कोंकणसृष्टी’ माझ्या गावाच्या वाटेवरतीच आहे. त्यामुळे गावी जाताना ‘कोंकणसृष्टी’ प्रोजेक्ट नेहमी दिसायचा. हा प्रकल्प अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. त्यामुळे मला तो आवडायचा म्हणूनच मी तेथे सुरुवातीला दोन प्लॉट्स विकत घेतले व घर बांधले. तिथले वातावरण आणि सोयी पाहून अजून दोन प्लॉट्स घेतले. माझ्या व्यवसायातून ठरवून वेळ काढून आम्ही सर्व कुटुंबीय इकडे महिन्या – दोन महिन्यातून एकदा तरी इकडे येतो आणि धमाल करतो.

श्री.निरज तुकाराम पत्तीर, वय 49 वर्षे
माझे मित्र रविंद्र जाधव यांनी ‘कोंकणसृष्टी’ मध्ये प्लॉट्स घेतले आणि त्यांनी जे वर्णन केले त्यावरुन फोनवरुनच मी त्यांच्याच शेजारचे दोन प्लॉट बुक केले. पुढे ते खरेदी केले. तेथे कोंकणभुमी डेव्हलपर्सकडून मला परसबाग तयार करुन मिळाली. आणि पाणी, मोठे रस्ते, कंपाऊंड, गेट, स्ट्रीट लाईट इत्यादी सर्व सोयी उपलब्ध करुन त्यांनी दिल्या आहेत. म्हणूनच अशा सुंदर आणि मनमोहक ठिकाणी भविष्यात घर बांधण्याची ईच्छा आहे.

श्री. संतोष भालेराव ( दादर, मुंबई)
श्री. अशोक हाडके (कोथरुड, पुणे)
श्री. शैलेश सावंत (दहिसर, मुंबई)
श्रीम. अलका माजळकर (बोरीवली, मुंबई)
श्री. अनंत वाडेकर (गोराई, मुंबई)
श्री. ऋषीकेश माने (बिबवेवाडी, पुणे)
सौ. दिपा सुवारे (विद्याविहार, मुंबई)
श्री. आनंद कदम (दादर, मुंबई)
सौ. विद्या कारेकर (कल्याण, मुंबई)
कु. शर्वरी माने (बिबवेवाडी, पुणे)
श्री. अनिल सावंत ( मालाड, मुंबई)
श्री. राजेंद्र गपचुप (चिंचवड, पुणे)