7517 20 5555 swapnsrushti@kbdrealestate.com
लांज्या विषयी थोडेसे..

लांजा… मध्य कोंकणातील एक विहंगम तालुका… जो मुंबई-गोवा महामार्गावर वसलेला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे ( Four Lane ) काम सुरु होतेय. २०१९ पर्यंत संपूर्ण हायवे चौपदरीत रुपांतरीत झाल्यावर, सर्वात सुंदर हायवे ( Scenic Highway ) मध्ये गणला जाईल.

• कोंकणातील पाचही जिल्ह्यातील प्रदूषण चाचणीत, सर्वात उत्तम हवा आणि शुद्ध पाणी यामुळे
अव्वल स्थानी आलेला तालुका.
• ह्या एकाच तालुक्यात ८ धरणं, अनेक बंधारे असल्यामुळे पाण्याची पातळी (Ground Water Level) मुबलक. बेनी, बेर्डेवाडी, पन्हळे, खोरनिनको, झापडे, शिपोशी, गवाणे, आणि कुवे हि धरणे तालुक्यातील फळबागांसाठी पूरक.
• भरपूर जंगल, वनसंपदा, शुद्ध पाणी, भाजीपाला, करवंद, बोरं, रातांबा, फणस व इतर अनेक फळे.
• सर्वात जास्त काजू उत्पादनात लांजा अग्रेसर,काजूचा आकार आणि चव Export साठी अनुकूल.
• सर्वात उत्तम आंबा पिक (रत्नागिरी हापूस) देणारा हा भाग. या एका तालुक्यात हजारोंच्या वर आंब्याच्या बागा. त्यातील ब-याच शेतकऱ्यांचा रसायन विरहीत (Organic Production) वर भर.
• हवामान… सर्वसाधारणपणे किमान १४ डिग्री सेल्सियस तर कमाल ३४ डिग्री सेल्सियस,
अक्षांश – १६.८५९१४५, रेखांश – ७३.५५३६९६९, समुद्र सपाटीपासून उंची -१६६ मी., पोस्टल
कोड – ४१६७०१.
• तासा दीड तासाच्या अंतरावर गणपतीपुळे, पावस, आंबाघाट, मार्लेश्वर, खोरनिनको येथील बल्लाळ गणेश, आडिवरेतील महाकाली, कोट येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे स्मारक
स्कुबा डायव्हिंग रत्नागिरी…
• माचाळ तालुका लांजा येथे लवकरच विकसित होणारे नवीन हिल स्टेशन, पक्षी निरीक्षण केंद्र आणि ऍग्रो टूरिझम हब.
• जागा, शेतजमीन, एन.ए.प्लॉट्स इत्यादी गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम तालुका.
• तालुक्यात चार रेल्वेस्टेशन – निवसर, आडवली, वेरवली आणि विलवडे. तालुक्यातील सर्व वाड्यांचे विद्युतीकरण, अंतर्गत डांबरीरस्ते आणि ७७% साक्षरता.

लांजा शहर ..