7517 20 5555 swapnsrushti@kbdrealestate.com

मित्रहो, नमस्कार,
कोंकणभुमी डेव्हलपर्स परिवाराच्या वतीने आपले स्वागत.

सह्याद्री पर्वताची उत्तुंगता आणि अरबी समुद्राची अथांगता जेथे आहे, नारळी पोफळीच्या बागा आणि बारमाही वाहणारे पाट जेथे आहेत, रानात चरायला जाणारी गाई-गुरे आणि त्यांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगरांचा आवाज ज्या परिसरात ऐेकायला मिळतो. तो अदभुतरम्य प्रदेश म्हणजे ‘कोंकण’ होय.! असंख्य किल्ले , देवस्थाने आणि नैसर्गिक हिरवळींच्या घाटांचा प्रदेश म्हणजे कोंकण.
अशा कोंकणांतून नव्याने मुंबई – पुण्यासारख्या मोठया शहरात येऊन स्थायिक झालेल्या माणसाला कोंकणांशी असलेलं नातं कायम टिकावं, असं सारखं वाटत असतं. यांचे सगे-सोयरे आजही गावातच आहेत. अशा माणसांचा सहवास लाभावा असे यांना वाटत असते. म्हणूनच कोंकणांत ‘रिटायरमेंट’ (Retirement) नंतर स्वतःचं हक्काचं घर असावं हे स्वप्न यांना सारखं खुणावत असतं. अशांना रिटायरमेंट होम आम्ही देतो.
कोंकण रेल्वेचा नवीन होणारा दुपदरी रेल्वेमार्ग, चौपदरी हायवे आणि सागरी महामार्ग तसेच प्रस्तावित जलवाहतुक आणि विमानसेवा इत्यादींमुळे इकडील दळणवळण आणखीनच सोयीचे होणार आहे. कोंकणांमधील प्रॉपर्टीमधील आर्थिक ‘गुंतवणूक’ (Investment) ही भविष्यामध्ये म्हणूनच लाभाची ठरणार आहे.
आपल्या मुलाबाळांनी, नातवंडांनी म्हणजेच ‘पुढील पिढीनेही’ (Next Generation) कोंकणांशी नाळ अशीच जपावी असं बरेचजणांना वाटतं. म्हणूनच गणपती उत्सवाला सर्वजण गावी येतात. होळीच्या वेळी, उन्हाळयाच्या सुट्टीतही सहकुटुंब कोंकणांत येतात, कारण आंबे, गरे, करवंद, काजू हे गावात येऊन खाण्यातच खरी मजा असते. ही मजा अनुभवण्याची संधी आमच्याकडे मिळते.
आणि यांच्यापैकी काहीजण तर विकेण्ड होम अर्थात सुट्टी घालवण्यासाठी ‘दुसरे घर’ (Second Home) म्हणूनही कोंकणाला पसंती देऊ लागलेले आहेत. गर्दीपासून दुर, एकटेपणा, वा`-याचा आवाज, वेळेचे बंधन नाही, शुन्य विचारातलं मन, स्थिर जग आणि हातात कॉफीचा मग… म्हणजेच परफेक्ट सेकंड होम.! ते आम्ही बांधून देऊ.
तर मित्रहो, यापैकी तुमचे जे स्वप्न असेल ते पुर्ण होण्यासाठी आमच्याकडे अनेक सर्वोत्तम पर्याय आहेत. कोंकणांत जागा घेऊन घर बांधायचं असेल, तर त्वरीत निर्णय घेण्याची हिच वेळ आहे. त्यासाठी आम्हांला जरुर संपर्क साधा.
धन्यवाद.

संस्थापक आणि संचालक

9

श्री.नितीन कदम
संस्थापक आणि संचालक
कोंकणभुमी डेव्हलपर्स

seedling

2004-2010 – अमृतसृष्टी
कोंकणभुमी डेव्हलपर्स च्या ‘गाव हव असणा-यांना गाव देतो’ या संकल्पातील पहिले पाऊल होते, अमृतसृष्टी, केळंबे, ता.लांजा. 10 डिसेंबर 2004 साली हा प्रकल्प सुरु झाला, आणि मुंबई-पुण्याच्या ग्राहकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सध्या येथे 19 घरे बांधलेली आहेत. बरचशी घरे नियोजित आहेत. लांजा एस.टी. स्थानकापासून साधारणपणे साडेतीन किमी अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे. डांबरी रस्त्याशेजारी आहे. हा प्रोजेक्ट 60 प्लॉट्सचा आहे आणि सर्व प्लॉटची विक्री झालेली आहे.

2010-2011 – भटवाडी
संकल्पातील दुसरे पाऊल होते. भटवाडी, लांजा येथे. खुद्द लांजामध्ये दीड एकर परिसरात 11 प्लॉट्सचा छोटेखानी प्रोजेक्ट स्थानिक आणि मुंबई परिसरातील ग्राहकांचा आम्हांला छान प्रतिसाद लाभला. लांजा एस.टी. स्थानकापासून दीड किमीवरती हा प्रोजेक्ट आहे. आजुबाजूला वस्ती आहे. येथे पाच घरे झालेली आहे. सर्व प्लॉट्सची विक्री झालेली आहे.

2011-2017 – कोंकणसृष्टी
संकल्पातील तिसरे पाऊल होते, कोंकणसृष्टी, खेरवसे, ता.लांजा. 21 ऑक्टोबर 2011 रोजी हा प्रकल्प सुरु झाला. मुंबई पुण्याच्या ग्राहकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. लांजा एस.टी.स्थानकापासून साधारणपणे सात किमी अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे. सध्या येथे 7 घरे बांधलेली आहेत. 34 एकरामध्ये 125 प्लॉट्सचा हा प्रोजेक्ट आहे. कोंकणातील सारी भुवैशिष्टये येथे हजर आहेत. एका बाजुला नयनरम्य तलाव, दुस-या बाजुला छानशी टेकडी, तिस-या बाजुला व्हॅली, इतके सुंदर स्थळ दुर्मिळ. म्हणूनच त्याला प्रतिसादही छान मिळाला. खेरवसे बस स्थानकाच्या शेजारी, डांबरी रस्त्याच्या बाजुला, पाण्याची विपुलता, आजुबाजूला निसर्गाचे वरदान यामुळे या प्रोजेक्टलाही भरभरुन प्रतिसाद मिळाला. यामध्ये काही मोजकेच प्लॉट्स विक्रीसाठी शिल्लक आहे.

2018 पासून पुढे – स्वप्नसृष्टी
मित्रहो, आपल्याला हवंय अस गाव की जेथे मुंबई-पुण्याहून येण्यासाठी दणळवळणाची साधने मुबलक असतील, निसर्गाचे सान्निध्य असेल, शहरवजा गाव जवळ असेल आणि तेथे हॉस्पीटल्स, मेडीकल स्टोअर्स, भाजीपाला, मोठी डिपार्टमेंटल स्टोअर्स, राष्ट्रीयकृत बँका आणि त्यांची एटीएम्स असं सार सारं काही तेथे मिळू शकेल. आणि हाकेच्या अंतरावर दैनंदिन वस्तूही मिळतील.